कोरपन्यात सूतगिरणीचा उद्योग विचाराधीन- खोत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

कोरपना (जि. चंद्रपूर) - विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, या भागात सूतगिरणीसारखा प्रक्रिया उद्योग नाही. कोरपना येथे सूतगिरणीचा उद्योग उभा करण्यास सरकार विचाराधीन आहे. त्याला लवकरच गती येईल, अशी ग्वाही कृषी, फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

कोरपना (जि. चंद्रपूर) - विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, या भागात सूतगिरणीसारखा प्रक्रिया उद्योग नाही. कोरपना येथे सूतगिरणीचा उद्योग उभा करण्यास सरकार विचाराधीन आहे. त्याला लवकरच गती येईल, अशी ग्वाही कृषी, फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे शनिवारी (ता. १३) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार ॲड. संजय धोटे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधरराव गिरटकर, कृऊबासचे सभापती श्रीधरराव गोडे, भाऊराव कारेकर, नगराध्यक्ष नंदा बावणे, गडचांदूरच्या नगराध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, सतीश धोटे यांची उपस्थिती होती. खोत म्हणाले, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. तो जगला पाहिजे, यासाठी शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कापूस उत्पादक बोंडअळीने संकटात सापडला आहे. त्यांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल. बोंडअळीने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी कृषी विभागाने प्रत्येक गावात ग्रामसभा लावून मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. १५ जानेवारीपासून तूर खरेदीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सिंचनाचे अपूर्ण असलेले प्रकल्प लवकरच पूर्ण करून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यावेळी शेतकऱ्यांना अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्‍टरचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात कोरपना तालुका भूषण पुरस्कार न्यायमूर्ती गिरटकर, शिक्षणमहर्षी पुरस्कार अंगणवाडीसेविका चंद्रकला झुरमुरे, ज्योत्स्ना मोहितकर, उर्वशी कोल्हे, प्रगतिशील शेतकरी देवराव ठावरी, रिमशा फिरदोस यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अनिल देरकर यांनी केले. संचालन किशोर निगम यांनी केले.

Web Title: chandrapur news sadhbhau khot yarn mill