आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या कर्जाचेही होणार स्थानांतरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

चंद्रपूर - आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे कर्जही त्याच ठिकाणी स्थानांतरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक एक-दोन दिवसांत निघणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले. या निर्णयाचा पहिल्या टप्प्यात बदल्या झालेल्या राज्यातील १७ हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

यंदा राज्यशासनाने शिक्षक आंतरजिल्हा बदलीची प्रकिया राबविली. राज्यभरात २५ हजार शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत होते. शासनाने यावर्षी राज्यस्तरावरून बदल्या करण्याचे धोरण आखले. मात्र, अनेक शिक्षकांच्या अंगावर त्या त्या जिल्ह्यातील कर्ज असल्यामुळे त्यांना बदली होऊनही जाण्याची परवानगी मिळत नव्हती. ही बाब महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना सांगितली. त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. 

याबाबत शासनाने ७ जुलैला एक परिपत्रक काढत असल्याची बाब मान्य केली. यापूर्वी सर्वच आंतरजिल्हा बदल्या जिल्हास्तरावरून होत होत्या. मात्र, या वर्षापासून राज्यस्तरावरून ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेकांना न्याय मिळाला. मात्र, स्थानिक प्रशासन त्यांची अनेक बाबीत अडवणूक करीत होते. त्यासाठी शासनाने प्रत्येकवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करीत बदल्या पार पाडल्याच. मात्र, बदली झाल्यावर भारमुक्त होताना त्यांना या जिल्ह्यातील आपले बाकी असलेले कर्ज भरून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्‍यक होते. कारण एकाचवेळी ५ ते १० लाखांचे कर्ज परतफेड करणे अशक्‍य होत होते. 

परिपत्रक निघणार 
या मागणीचा आमदार भांगडिया यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेत आंतरजिल्हा बदली शिक्षकांचे कर्ज स्थानांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे परिपत्रक आता निघणार आहे.

Web Title: chandrapur news teacher