पोलिसांना पाहून यूटर्न घेणे कारचालकाला पडले महागात

गडचांदूर : जप्त करण्यात आलेला दारूसाठा.
गडचांदूर : जप्त करण्यात आलेला दारूसाठा.

कोरपना/गडचांदूर (जि. चंद्रपूर) : लॉकडाउनमध्ये कोरडा पडलेला गळा ओला करण्यासाठी तळीराम वाटेल ती किंमत मोजत आहेत. अशा तळीरामांना सुविधा पुरविण्यासाठी दारूतस्कर पुढे सरसावले आहेत. यवतमाळ जिल्ह्याची सीमा पार करणाऱ्या कारचा पाठलाग करून गडचांदूर पोलिसांनी सात लाख तीस हजारांची दारू जप्त केली.

दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चालक फरार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये दारूतस्करी वाढल्याचा घटना समोर येत आहेत.

चंद्रपूर हा दारूबंदीचा जिल्हा. बंदीतही येथे दारूला तोटा नाही. हाक देताच जिल्ह्यात दारू उपलब्ध व्हायची. आता तर लॉकडाउनमध्येही तळीरामांना सुविधा देण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍याला तेलंगणा आणि यवतमाळ जिल्ह्याची सीमा लागलेली आहे.

कारचालकाने यूटर्न मारला

लॉकडाउनमध्ये सीमा बंद आहेत. मंगळवारला कोरपना-यवतमाळ जिल्ह्याची सीमा असलेल्या पैनगंगा सीमेवर गडचांदूर सीमापार करणाऱ्या स्कुटीची तपासणी गडचांदूर पोलिस करीत होते. यादरम्यान एमएच-34-8677 क्रमांकाची कार आली. पोलिसांना बघताच कारचालकाने यूटर्न मारला. पोलिसांना शंका आली. पोलिसांनी कारचा पाठलाग केला.

विदेशी दारूच्या सोळा पेट्या

कारच्या तपासणीत विदेशी दारूच्या सोळा पेट्या आढळून आल्या. संपत समय्या चारुपाका, सोनल भानुदास बेलके या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर कारचालक राजू करपुरी फरार आहे. आरोपीकडून सात लाख तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ही कारवाई ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात शकील अन्सारी, अरविंद तुराणकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com