15 जुलैपासून चंद्रपूर वीज केंद्र बंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

तीन हजार मेग़ावॅट वीज निर्मिती क्षमता या केंद्राची आहे. ते बंद झाल्यास राज्यात वीजेचे संकट निर्माण होऊ शकते. याचा धरणावरून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. ते एकमात्र स्त्रोत आहे. परिणामी शहरात सुद्धा पाणी टंचाई होऊ शकते. सध्या धरणात १८ दलघमी पाणीसाठा आहे. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने सुद्धा १५ जुलैपर्यंत पाऊस न आल्यास वीज केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून सुरू होऊन जवळपास २५ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १५० मि.मी.च्यावर पाऊस पडला आहे.

Web Title: Chandrapur power station closed from July 15