Summer : चंद्रपुरात मोसमातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद

उन्हाच्या सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांमध्ये बसला आहे.
Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik News
Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik Newsesakal

चंद्रपूर : राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरीक घामाघूम झालेले आहेत. तर, दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानाने उच्चांक गाठला असून, चंद्रपूरमध्ये मोसमातील सर्वात उच्चांकी तापमानची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचे तीव्र चटके नागरिकांना सहन करावे लागत असून, आज येथे 45.4 इतक्या उच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik News
''भारतानं कोणत्याही देशाला, समाजाला धोका निर्माण केलेला नाही''

राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून, उन्हाच्या सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांमध्ये बसला आहे. बुधवारी जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद महाराष्ट्रातल्या तीन शहरांमध्ये करण्यात आली असून, ब्रह्मपुरीत 45.3, चंद्रपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमान तर अकोल्यातही 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे येथील नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com