आरटीओतील मदतनिसास रंगेहात अटक

File photo
File photo

चंद्रपूर : वाहनाचे ऑल इंडिया परमिट मिळवून घेण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना आरटीओच्या परवाना विभागातील मदतनीस संजय नगराळे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (ता. 3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार हे ट्रॅव्हलसचे काम करतात. त्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले. नव्या चारचाकीचे ऑल इंडिया परमिट काढण्याकरिता त्यांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता आरटीओ कार्यालयात केली. कार्यालयाचे दोन हजार रुपये शुल्क त्यांनी ऑनलाइन भरले. त्याची पावतीही त्यांच्याकडे आहे. गुरुवारी तक्रारदार आरटीओ कार्यालयातील परवाना विभागात कार्यरत असलेला मदतनीस संजय नगराळे याच्याकडे गेले. त्यांनी नगराळेला वाहनाचे परमिट मागितले. नगराळेने परमिटसाठी दोन हजारांची मागणी केली. तक्रारदाराने याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार केली. प्राप्त तक्रारीवरून केलेल्या पडताळणी कारवाईत लाचेची मागणी स्पष्ट झाली. त्यानुसार आरटीओ कार्यालयात सापळा रचून नगराळेला रंगेहात पकडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com