प्रदूषित शहरात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

देशात महाराष्ट्राचे तारापूर हे शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले असून, त्यानंतर दिल्ली, मथुरा, कानपूर, वडोदरा, मुरादाबाद, वाराणसी, बुलंद शहर, गुडगाव आणि  मनाली या १० शहरांचा समावेश आहे. 

चंद्रपूर -  राष्ट्रीय हरित लवादाने नुकतीच देशातील सर्वांत प्रदूषित शहरे आणि औद्योगिक क्षेत्रांची यादी सेपी स्कोर प्रकाशित केला. त्यात महाराष्ट्रातील तारापूर हे देशात ९३.६९ टक्के घेत सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. दिल्ली आणि मथुरा दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. 

महाराष्ट्रातील तारापूर (९३. ६९) प्रथम, द्वितीय चंद्रपूर (७६.४१), तृतीय क्रमांकावर औरगांबाद (६९.८५) शहर आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. देशात महाराष्ट्राचे तारापूर हे शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले असून, त्यानंतर दिल्ली, मथुरा, कानपूर, वडोदरा, मुरादाबाद, वाराणसी, बुलंद शहर, गुडगाव आणि  मनाली या १० शहरांचा समावेश आहे. 

देशात सर्वोधिक प्रदूषित शहरे उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील नऊ शहरे प्रदूषित यादीत आहेत. त्यात सर्वाधिक तारापूर, तर दुसरे चंद्रपूर आहे. त्यानंतर औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर, पिंपरी आणि महाड यांचा समावेश आहे. 

चंद्रपूरचा पूर्वीचा सेपी स्कोर हा ५४. ५३ टक्के होता. त्यानंतर तो वाढून ६१ वर गेला. २०१८ च्या  सर्वेक्षणानुसार हा क्रमांक वाढून तो ७६.४१ झाला आहे. आता चंद्रपूर हे प्रदूषित श्रेणीतून अत्यंत प्रदूषित श्रेणीत गेले आहे. भारताच्या बाबतीत चंद्रपूर हे २७ व्या क्रमांकावर गेले असून, हवा प्रदूषणात चंद्रपूर हे भारतात ८ व्या क्रमांकावर गेले असल्याची माहिती ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. चोपणे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur second in the polluted city