video : प्रबोधनाची 'ऑल इन वन' लग्नपत्रिका 

विनोद चौधरी 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

आपले लग्न थाटामाटात कसे करता येईल व आपली लग्नपत्रिका इतरांपेक्षा कशी आकर्षक वाटेल यासाठी अनेकजण लाखोंचा खर्च करतात. तसेच लग्नपत्रिकाच सामाजिक संदेश देणार अशी तयार केली जाते. लग्नपत्रिका आगळीवेगळी छापून सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला जातो. 

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : आयुष्याच्या वेलीवर हळूवार फुलणारे पान म्हणजे तारुण्य होय. याच तारुण्यात दोन जिवांच्या सात जन्माच्या गाठी जुळविणारी संस्कार म्हणजे विवाह सोहळा. सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याचा हंगाम सुरू आहे. प्रत्येकासाठी त्याचा विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. आपला विवाह सोहळा अविस्मरणीय ठरावा यासाठी प्रत्येकजण काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च केला जातो. परंतु, पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा साजरा करतानाच सामाजिक संदेश लोकांपर्यंत सहज पोहोचवणे शक्‍य आहे.

लग्नपत्रिकांसह समारंभ थाटात पार पाडण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. आपले लग्न सर्वांपेक्षा थाटामाटात कसे करता येईल व आपली लग्नपत्रिका इतरांपेक्षा कशी आकर्षक वाटेल यासाठी अनेकजण लाखोंचा खर्च करतात. तसेच लग्नपत्रिकाच सामाजिक संदेश देणार अशी तयार केली जाते.

No photo description available.

लग्नपत्रिका आगळीवेगळी छापून सामाजिक जनजागृतीचा संदेश दिला जातो. अगदी याच विचारातून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्‍यात येणाऱ्या गांगलवाडी येथील तरुणाने "ऑल इन वन' सामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका छापली आहे. ही आगळी वेगळी लग्नपत्रिका सध्या तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरली आहे. 

No photo description available.

गांगलवाडी येथील रहिवासी मंगेश पुरुषोत्तम सूर्यवंशी हा नागपूर येथे रेल्वे बांधकाम विभागात खलाशी पदावर कार्यरत आहे. त्याचे लग्न नागपूर येथील शिवनगर, पुनापूर रोड, पारडी येथील रहिवासी डिंपल हरीश दाणे हिच्याशी जुळले. त्यांचा विवाह सोहळा शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) भवानी माता सभागृह, पुनापूर रोड, पारडी रोड येथे पार पडणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या मंगेशने लग्नपत्रिकेतूनही प्रबोधन केले आहे. 

मंगेशच्या लग्नपत्रिकेतून "स्वच्छतेतून समृद्धीकडे', "बेटी है वरदान इसका करे सन्मान', "बेटी बचाव, बेटी पडाव', "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', "सब पढे सब बडे', "सायकल चालवा पर्यावरण वाचवा' असे घोषवाक्‍य वाचायला मिळतात. महात्मा ज्योतीबा फुले यांचे "विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली', हा विचार लग्नपत्रिकेत दिसते. सध्या तालुक्‍यात ही पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. 

समाजाला नवी दिशा देण्याचे काम 
लग्नपत्रिकेच्या माध्यमातून समाजप्रबोधन होऊ शकतो का? असा विचार मनात आला. लिंगभेद, अज्ञान, अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडण्यासाठी व समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम लग्नपत्रिकेतून होऊ शकते, अशी कल्पना आल्याने लग्नपत्रिकेत सामाजिक प्रबोधनावर भर दिला आहे. 
- मंगेश सूर्यवंशी, 
नवरदेव, गांगलवाडी (जि. चंद्रपूर)

 

Image may contain: 1 person, smiling

उपदेश देण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात
केवळ उपदेश देण्यापेक्षा चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःपासून व्हावा, या हेतूने मी लग्नपत्रिकेवर विविध सामाजिक संदेश दिले आहेत. ते परिणामकारक ठरतील, असा 
मंगेश सूर्यवंशी म्हणाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur : Social Message from Wedding invitation