कुचकामी वनविभाग, कपारीत फसलेला "तो' वाघ दगावला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

भद्रावती तालुक्‍यातील माजरी-चारगाव मार्गावर शिरणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेला हा वाघ पुलाखाली उतरून पाण्यात बसला. त्याच्या कमरेला जबर मार बसल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा वाघ लोकांना दिसला. तेव्हापासून मध्यरात्रीच्या दोन वाजेपर्यंत तो तसाच फसलेल्या अवस्थेत राहिला. त्याला वाचवण्यासाठी दीर्घकाळ मिळूनही वनविभागाला वाघाला वाचवता आले नाही.

चंद्रपूर : वनविभागाच्या ढिसाळ आणि अनुभवशून्य प्रयत्नांमुळे एका पूर्णवाढ झालेल्या वाघाचा हकनाक मृत्यू झाला. 24 तास नदीच्या पात्रात मृत्यूशी संघर्ष करीत असलेल्या वाघाला एवढी मोठी यंत्रणा वाचवू शकली नाही. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. 

भद्रावती तालुक्‍यातील माजरी-चारगाव मार्गावर शिरणा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेला हा वाघ पुलाखाली उतरून पाण्यात बसला. त्याच्या कमरेला जबर मार बसल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हा वाघ लोकांना दिसला. तेव्हापासून मध्यरात्रीच्या दोन वाजेपर्यंत तो तसाच फसलेल्या अवस्थेत राहिला. त्याला वाचवण्यासाठी दीर्घकाळ मिळूनही वनविभागाला वाघाला वाचवता आले नाही. हे वनविभागाचं मोठे अपयश मानले जात आहे. 

महिला अधिकाऱ्याने फोडले फटाके 
बचावकार्यादरम्यान एका महिला अधिकाऱ्याने फटाके फोडून वाघाला चिडवण्याचाही प्रकार केला. हा प्रकार वाघाला पकडण्यासाठीच होता, असे वनविभागाचे मत आहे. मात्र फटाके केव्हा फोडायचे? याचेही एक तंत्र असते, पण तेही दुर्लक्षित करण्यात आले. जिथे वाघ अडकला किंवा संचार करीत होता, तिथपर्यंत पोचणे सहज शक्‍य होते. किमान त्याला पाण्याबाहेर काढता आले असते. पण तसेही झालेले दिसले नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात विच्छेदनासाठी नेण्यात आला. अहवालानंतरच वाघाच्या शारीरिक जखमांची आणि मृत्यूच्या कारणांची माहिती समोर येऊ शकेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrapur tiger died who was sucked in the gap of rocks