वन्यजिवांना बघण्यासाठी आता पर्यटक पिंजऱ्यात

अमित वेल्हेकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

चंद्रपूर : जंगलातील एका मोठ्या बंदिस्त क्षेत्रात वाघ, सिंह, बिबट्यासारख्या प्राण्यांना खुले सोडून पिंजऱ्यात असलेल्या पर्यटकांना या प्राण्यांचे दर्शन घडविण्याचा प्रकल्प देशात अनेक राज्यांत सुरू आहे. याच धर्तीवरील हा प्रयोग आता चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात केला जाणार आहे. या प्रकल्पावर उद्या, शुक्रवारी (ता. 3) टाटा ट्रस्ट आणि ताडोबा प्रकल्प यांच्यामध्ये मुंबई येथे महत्त्वाचा करार होत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आता जागतिकस्तरावर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे येथील बुकिंग नेहमी फुल्ल असते. अनेक पर्यटकांना बुकिंग न मिळाल्यामुळे निराश होऊन परतावे लागते. त्यातही हा प्रकल्प पावसाळ्यात पूर्णपणे बंद असतो. मात्र, आता येणाऱ्या पर्यटकांना वन्यजिवांचे जवळून दर्शन घेण्यासाठीची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. पर्यटकांना खुल्या वन्यजिवांचा चित्तथरारक अनुभव घेता यावा यासाठी सध्या अनेक राज्यांत असे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यात हा प्रकल्प सुरू आहे. यामध्ये पर्यटकांना वाहनावरील एका पिंजऱ्यात बसवून मोकळ्या असलेल्या वन्यजिवांचे दर्शन घडविल्या जाते. असाच प्रकल्प आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प होणार आहे. याकरिता पद्‌मापूर जंगल क्षेत्रातील 200 हेक्‍टर जमीन उपयोगात येणार आहे. हा प्रकल्प चार भागांत विभागलेला असणार असून यामध्ये अनुक्रमे वाघ, बिबट, अस्वल आणि तृणभक्षक प्राणी यांच्याकरिता राखीव जागा असणार आहे. तृणभक्षक वगळता प्रत्येक प्राण्याकरिता विशेष परिसर असणार आहे. त्याच्या सभोवताल आठ ते दहा फूट उंच अशी भिंत असणार आहे. हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे याचे स्वरूप टाटा ट्रस्टच्या वतीने तयार केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात वन्यजिवांचे दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना हा प्रकल्प खुणावणार आहे.

Web Title: chandrapur tourist news

टॅग्स