चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात बाळाची अदलाबदल?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

चंद्रपूर - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी (ता. १२) दुपारी सविता आत्राम या महिलेची प्रसूती झाली. तीन तासांनंतर महिलेला तिचे बाळ देण्यात आले. बाळ आपले नाही. त्याची अदलाबदल करण्यात आली आहे, असा आरोप या महिलेने केला असून बाळ स्वीकारण्यास तिने नकार दिला. तिच्या पतीने याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

सविता आत्राम राजुरा तालुक्‍यातील विरूर येथील रहिवासी आहे. सोमवारी (ता. ११) दुपारी १२.३० वाजताच्या सुमाराला तिने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळाला जन्म दिला.

डॉ. शीतल श्‍यामकुळे यांनी तिची प्रसूती केली. सविताचे सिझर झाले. तीन तासांनंतर परिचारिकांनी तिच्याकडे नवजात बाळ सोपविले. मात्र, बाळाला बघताच हे माझे बाळ नाही. या बाळाचे पाय वाकडे आहेत, असे म्हणत त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. यामुळे रुग्णालय प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे. तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, सविता आत्राम ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. प्रसूतीनंतर लगेच बघितलेले बाळ पूर्णपणे स्वस्थ होते. माझ्या बाळाची अदलाबदल झाली आहे, असे तिचे म्हणणे आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी बाळाची अदलाबदल झाली नाही, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. एक दिवसाचे बाळ सध्या अतिदक्षता विभागात आहे. जन्मत:च त्याला आईचे दूधही मिळाले नाही. दरम्यान, महिलेच्या पतीने यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

२४ तासांनंतर घेतली दखल
सविताने बाळ स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर प्रसूती वॉर्डात एकच खळबळ उडाली. तिच्या नातेवाइकांनी बाळ आमचे नाहीच, म्हणत आरडाओरड सुरू केली. मात्र, चोवीस तासांपर्यंत रुग्णालयाच्या प्रशासनाने याची दखलच घेतली. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकरण लावून धरले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी महिलेच्या नातेवाइकांशी चर्चा केली. 

पत्नीची चंद्रपूर येथे दोनवेळा सोनोग्राफी केली. बाळ जर दिव्यांग असते, तर याबाबतची आधीच माहिती झाली असती. प्रसूतीनंतर माझ्या पत्नीने बाळाला बघितले होते. प्रसूतीदरम्यान उपस्थित डॉक्‍टर आणि परिचारिकांनी बाळ पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असे सांगितले. तीन तासांनंतर आम्हाला दुसरेच बाळ देण्यात आले.
- संतोष आत्राम, वडील

Web Title: chandrapur vidarbha news born baby chages in district hospital