कामासाठी आले नी गावातच अडकले, भटक्यांना गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात

chandrapur villegers help
chandrapur villegers help

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गावात लोहाराचे काम करणारी मध्यप्रदेशातील भटक्या समुदायातली नऊ कुटुंब गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास होती. कोरोनाने काम थांबले. या कुटुंबातील जवळपास 40 सदस्यांचे अक्षरश: खाण्यापिण्याचे वांधे झाले. मग काय गावकरी मंडळींनी  निर्णय घेतला. अशा संकटसमयीदेखील लोकवर्गणी करून 9000 रुपये जमा केले. या पैशातून त्या सगळ्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक महिलेला तीनशे रुपये देण्यात आले. विठ्ठलवाडावासीयांच्या या संवेदनशीलतेने मध्यप्रदेशातील लोहार कुटुंबियांचे डोळे पाणावले.

उन्हाळ्याच्या दिवसांत रोजगाराची संधी नसल्याने आपले कुटुंब घेऊन मध्यप्रदेशातील नऊ कुटुंब गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाड्यात आली. लोहार समाजातील ही मंडळी शेतीउपयोगी साहित्य तयार करून त्यातून मिळालेल्या कमाईतून आपल्या 40 सदस्यांचे कसेबसे पोट भरीत होती. गेल्या महिनाभरापासून ते इथेच आहेत. देशात अचानक कोरोनाने दस्तक दिली. अन् होत्याचे नव्हते झाले. लॉकडाऊनने गेल्या दहा दिवसांपासून ते बेरोजगार झाले. भलेमोठे कुटुंब, उरलेसुरले सगळे साहित्यही संपलेले. अशात पोटाचे काय होणार ही चिंता सताऊ लागली.
गावखेड्यातील दिलदार लोकांना या भटक्या कुटुंबाची अवस्था बघविल्या गेली नाही. प्रशासन त्यांना मदत करेल याची वाट न बघता गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला. त्यांना मदत करण्याचा.

अन् मग काय अनेक हात समोर आले. यातून 9000 रुपये जमा झाले. या पैशातून त्यांनी लोहाराच्या 9 कुटुंबातील सदस्यांना पंधरा दिवस पुरेल एवढे साहित्य खरेदी करून दिले. एवढेच नाही तर प्रत्येक महिलेला तीनशे रुपये दिले. विठ्ठलवाडावासीयांची ही सह्रदयता बघून अख्ख्या बिऱ्हाडाचे डोळे पाणावले.

खरं तर विठ्ठलवाडा हे लहानसे गाव राजकीयदृष्टीने प्रेरीत असणारे. राजकारणातून अनेकदा तंटेही झालेत. पण या संकटकाळात गावाने आपले वेगळेपण दाखविले. माणुसकी हीच तर असते याचा परियचदेखील दिला.

गुराढोरांचीही काळजी
लोहारांच्या कुटुंबासोबत असलेल्या त्यांच्या गुराढोरांच्याही चार्यांचा प्रश्न सोडवीत गावकऱ्यांनी संपूर्ण बिऱ्हाडाची काळजी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com