चंद्रपूरला जाणारी दारू पकडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

भिवापूर (जि. नागपूर) ः पोलिस विभागाकडून वारंवार कारवाई होत असूनही दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनाने होणारी दारूची चोरटी वाहतूक थांबलेली नाही. बुधवारी रात्री अशाच एका दारू भरून जात असलेल्या कारचा पाठलाग करून भिवापूर पोलिसांनी 42 पेट्या दारूसह वाहन जप्त केले.

भिवापूर (जि. नागपूर) ः पोलिस विभागाकडून वारंवार कारवाई होत असूनही दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी वाहनाने होणारी दारूची चोरटी वाहतूक थांबलेली नाही. बुधवारी रात्री अशाच एका दारू भरून जात असलेल्या कारचा पाठलाग करून भिवापूर पोलिसांनी 42 पेट्या दारूसह वाहन जप्त केले.
या कारवाईत एका आरोपीसह एकूण 7 लाख 20 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटक केलेल्या आरोपीचे नाव सतनामसिंग हरनामसिंग जुनी (वय37) असे असून तो उमरेड मार्गावरील ठाणा येथे राहतो. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एएसआय नेताम त्यांचे सहकारी राजन भोयर, प्रीतम पवार हे उमरेड भिसी मार्गावर पेट्रोलिंग करित असताना पाहमी चिचाळा फाट्याजवळ एक चारचाकी उमरेडमार्गे भिसीच्या दिशेने संशयास्पद स्थितीत जाताना दिसली. नेताम यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु, न थांबता चालकाने वाहन वेगाने पळवून नेले. पोलिस वाहनाने त्याचा पाठलाग केला असता एका ठिकाणी वाहन उभे करून अंधाराचा फायदा घेत चालक पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 42 पेट्या आढळून आल्या. वाहन व दारू अंदाजे किंमत 7 लाख 20हजार 960 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त करून पोलिस ठाण्यात नेली. वाहन सोडून पसार झालेल्या सतनामसिंग हरनामसिंग या चालकाला पोलिसांनी गुरुवारी ठाणा येथून अटक केली. ठाणेदार वैरागडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआई संतोष जाधव पुढील तपास करीत आहेत.
व्यवसायातील बडा मासा
जप्त करण्यात आलेली चारचाकी सुंदरसिंग जुनी याच्या मालकीची असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. उमरेड येथील एका देशी दारू दुकान चालकाकडून दारू खरेदी करून ती चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येत असताना चारचाकी पोलिसांच्या हाती लागली. ही दारू सुंदरसिंग याची असल्याचे सांगण्यात येत असून तो या व्यवसायातील बडा मासा असल्याचे समजते. चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नों
द आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrapur was caught by alcohol