रुग्णवाहिकेवरून आरोग्य विभागावर तोफ, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजले शेळ्या-बोकड मृत्यूप्रकरण

chandrapur zp asked to health department on ambulance issue
chandrapur zp asked to health department on ambulance issue

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवीन 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. यातील वीस रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केल्या. याची कुठलीच माहिती आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, आरोग्य समितीला दिली नाही.  याचे पडसाद बुधवारी (ता. 11) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधारी, विरोधकांनी आरोग्य विभागावर तोफ डागली. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाइन पार पडली. जिल्हा परिषदेचे सदस्यांसाठी पंचायत समिती, ग्रामपंचायतस्तरावर व्यवस्था करण्यात आली होती. अध्यक्ष, सभापतींसाठी जिल्हा परिषदेत व्यवस्था करण्यात आली. कोरोनाच्या सावटात प्रशासनाने नवीन 38 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यातील 20 रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केल्या. मात्र, याची कुठलीच कल्पना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, आरोग्य समितीला देण्यात आली नाही. याच मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधकांनी आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी मांडला. त्यावर संजय गजपुरे, सतीश वारजूकर यांनी अनुमोदन देत ठराव पारित केला. 

54-2 मध्ये कोरोनाच्या सावटात जिल्हा परिषद अध्यक्षांनी 88 लाखांचा निधी दिला. पण, हा निधी केवळ डिझेल, पेट्रोल व स्टेशनरी खरेदीवर केल्याचा आरोपही सदस्यांनी केला. चांदा-बांदा योजनेतून खरेदी केलेल्या शेळ्या-बोकड मृत्यू पावले. पण, लाभार्थ्यांना अद्याप विमा संरक्षणाचा लाभ मिळाला नाही. याप्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्याची मागणी सदस्यांनी रेटून धरली. ग्राम संघांना काही रक्कम वळती करण्यात आली. त्या रक्कमेचेही लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी सदस्यांनी यावेळी रेटून धरली. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष रेखा कारेकार, सभापती नागराज गेडाम, राजू गायकवाड, सुनील उरकुडे, संजय गजपुरे, सतिश वारजूकर आदींची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com