बावनकुळे पूर्व विदर्भाचे प्रचारप्रमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पूर्व विदर्भाचे प्रचारप्रमुख करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 

नागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पूर्व विदर्भाचे प्रचारप्रमुख करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 
प्रदीर्घ अनुभव आणि संघटनकौशल्याच्या जोरावर भाजपला भरघोस यश मिळवून देण्यात आपण योगदान द्याल, अशी आशा बावनकुळे यांच्याकडून प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बावनकुळे यांचे समर्थक प्रचंड संतापले आहेत. तेली समाजातर्फे भाजपला पाडण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर सकाळपासूनच तशा पोस्ट व्हायरल होत आहेत. हे सर्व प्रकार थांबविण्याचे आवाहन बावनकुळे यांनी समाजबांधवांना केले आहे. बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. ऊर्जा व अबकारी अशी महत्त्वाच्या खात्याचे ते मंत्री आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. कामठी मतदारसंघात केलेली विकासकामे, संघटनबांधणी व कार्यकर्त्यांची फळी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. 
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrashekhar bawankule, east vidarbha