चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेकडून कुठलीही ऑफर नाही

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेकडून कुठलीही ऑफर नाही

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांना शिवसेनेकडून ऑफर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी त्या फक्त अफवा असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भाजपातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 
कामठीमधून उमेदवारी नाकारल्याने बावनकुळे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत. मंत्रिपद आणि विदर्भाचे नेतेपद देण्याची ऑफर त्यांना दिली असल्याची जोरदार चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. यावर मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, आपणास सर्वकाही भाजपनेच दिले, त्यामुळे भाजप सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार बनेल. भाजपच्या कोअर समितीने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. 
फडणवीस यांनी आतापर्यंत उत्कृष्ट प्रशासन सांभाळले. राज्यातील दुष्काळ यशस्वीपणे हाताळला. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवला. फडणवीस महाराष्ट्राला मिळालेले "गॉड गिफ्ट' आहे. तेच मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी निवडणुकीत फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली निवड होणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले की, पक्षाने आतापर्यंत जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारण्यात येईल, असे बावनकुळे म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com