चांद्रयान-2 चे लॅंडर व रोव्हर सापडण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नागपूर ः चांद्रयान-2 मध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत नेले. त्यांनतर चंद्राच्या तळावर लॅंडिंग करणे या अडचणीच्या टप्प्यात लॅंडर व रोव्हरचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. याचा अर्थ विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर नष्ट झाले असा होत नाही. कदाचित इलेक्‍ट्रॉनिक्‍स कारणामुळे हा संपर्क तुटला असेल. मात्र इस्रो केंद्राशी ऑर्बिटरचा संपर्क कायम असून येत्या काळात लॅंडर व रोव्हर सापडण्याची शक्‍यता कुमेन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत भूषण जोशी यांनी आज व्यक्त केली.

नागपूर ः चांद्रयान-2 मध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांनी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत नेले. त्यांनतर चंद्राच्या तळावर लॅंडिंग करणे या अडचणीच्या टप्प्यात लॅंडर व रोव्हरचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. याचा अर्थ विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हर नष्ट झाले असा होत नाही. कदाचित इलेक्‍ट्रॉनिक्‍स कारणामुळे हा संपर्क तुटला असेल. मात्र इस्रो केंद्राशी ऑर्बिटरचा संपर्क कायम असून येत्या काळात लॅंडर व रोव्हर सापडण्याची शक्‍यता कुमेन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत भूषण जोशी यांनी आज व्यक्त केली.
रामन विज्ञान केंद्रात आयोजित चांद्रयान-2 मोहीम मॉडेलच्या उद्‌घाटनप्रसंगी आयोजित व्याख्यानात डॉ. जोशी यांनी अंतराळ तंत्रज्ञानातील भारताची भरारी या विषयावर मार्गदर्शन केले.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या चंद्राच्या दक्षिण धुव्रावरील तळाशी पोहचू शकलो आणि संपर्कात असलेले ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. त्यामुळे शक्‍यतो लॅंडर आणि रोव्हरशी पुन्हा संपर्क स्थापित होईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. आपण अपयशी नाही तर यशस्वी ठरलो, अशी प्रतिक्रिया देत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)च्या वैज्ञानिकांचे कौतुक केले. रामन विज्ञान केंद्र आणि तारामंडळाच्या वतीने चांद्रयान-मिशनबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शनासाठी शनिवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मधुकर आपटे, प्राचार्य भारतभूषण जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विज्ञान शिक्षण विभागाचे डॉ. रवींद्र रमतकर आणि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजयशंकर शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. भारतभूषण जोशी यांनी चांद्रयान मोहिमेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. मधुकर आपटे यांनी विक्रम लॅंडर यशस्वीपणे चंद्राच्या तळावर उतरल्यानंतर रोव्हरसोबत कोणते कार्य करणार होते, चंद्र व पृथ्वीच्या दिवसातील फरक आणि इतर गोष्टींबाबत सविस्तर माहिती दिली. आयोजनात केंद्राचे अभिमन्यू भेलावे, विलास चौधरी व मनोजकुमार पांडा यांचा सहभाग होता. चांद्रयान-2 मिशनची उत्सुकता लक्षात घेता रामन विज्ञान केंद्रातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन चार दिवसांपासून केले जात आहे. याअंतर्गत चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा व चंद्रयान विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेत 380 विद्यार्थी, भाषण स्पर्धेत 27 विद्यार्थी तर प्रश्नमंजूषा स्पर्धेत 38 शाळांच्या टीम सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

चांद्रयान रोव्हरचे हुबेहूब मॉडेल
इस्रोच्या चांद्रयान मोहिमेतील प्रत्येक गोष्टीबाबत इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी रामन विज्ञान केंद्रात "सायन्स ऑन स्पेअर' या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन पुढे महिनाभर चालणार आहे. रॉकेट लॉंचर, पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे आर्बिटर पुढे चंद्राच्या कक्षेत कसे पोहचते. त्यानंतर लॅंडर आर्बिटरपासून कसे वेगळे होते व चंद्रावर कसे लॅंड करते याबाबत माहिती चित्रांच्या रूपात साकारलेली आहे. विक्रम लॅंडर यशस्वीपणे लॅंड झाले असते तर रोव्हरने कशाप्रकारे काम केले असते, याचे प्रत्यक्ष दर्शन रामन विज्ञान केंद्रात होऊ शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan-2 Lander and Rover Possible