तलावात बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

Death in lake
Death in lakesakal media

चांदुर : स्थानिक गुरुकृपा कॉलनी (Gurukrupa colony) येथे राहणारे हमीद खा पठाण यांचा 17 वर्षीय मुलाचा बासलापुर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू (drowning death) झाला. काका सोबत दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बासलापुर तलाव (baslapur lake) येथे फिरायला गेले असतांना ही घटना घडली.

Death in lake
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती; मंडपातच पार पडला विसर्जन सोहळा

धामणगाव तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पठाण शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान त्यांचे दोन मुलं अरमान आणि अमानत त्यांच्या काका व काकु व चुलत भावासोबत बासलापुर तलाव परिसरात फिरायला गेले होते. परत येत असतांना मुलांनी पोहण्यासाठी तलावात उडी मारली असतांना ते गाळात अडकले.

त्यामुळे त्यांच्या काकांनी ही पाण्यात उडी मारली असता तेही अडकले. सदर घटना लक्षात येताच जवळच गणपती विसर्जनासाठी आलेले लोक धावून गेल्याने इतर तिघांचे प्राण वाचले. परंतु तोपर्यंत अरमान पठाण हा 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याचे समजते. अरमान हा वर्ग 12 वि मध्ये शिकत होता. नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून पठाण सरांची शिक्षक वर्गात ओळख आहे आज त्यांच्याच कुटुंबावर शोककळा कोसळली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com