जिल्हाधिकारी कार्यालयात जुन्या नोटा बदलणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नागपूर - जिल्ह्यातील नागरिकांना जुन्या चलनी नोटा बदलणे सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारपासून 500 आणि हजार रुपयांच्या चलनी नोटा बदलून देण्याच्या केंद्राचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते झाले. उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोस्ट ऑफिस, एक्‍सिस बॅंक आणि अलाहाबाद बॅंकेचे प्रत्येकी एक अशी तीन केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

शहरासोबतच ग्रामीण भागातही केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने जनतेने घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. महानगरपालिका क्षेत्रात भारतीय टपाल खात्याचे झोननिहाय एक आणि पाचपावली पोलिस ठाणे येथे फिरते केंद्र (मोबाईल व्हॅन) अशी एकूण 11 केंद्रे सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. चलन विनिमय केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी भारतीय डाक विभागाचे धम्मजोती गजभिये, अनन्या गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव, अलाहाबाद बॅंकेचे सहायक महाव्यवस्थापक आर. के. मिश्रा उपस्थित होते.

येथे आहेत केंद्र
लक्ष्मीनगर झोन : आठ रस्ता चौक, पाण्याच्या टाकीजवळ
धरमपेठ झोन : गोकूळपेठ बाजार
हनुमान नगर झोन : हनुमाननगर, तुकडोजी पुतळ्याजवळ
धंतोली झोन : धंतोली पोलिस ठाण्याजवळ
नेहरूनगर झोन : नेहरूनगर गार्डनजवळ
गांधीबाग झोन : टाऊन हॉलजवळ, महाल
सतरंजीपुरा झोन : इतवारी लोहा बाजार
लकडगंज झोन : टेलिफोन एक्‍स्चेंज पेट्रोलपंपाजवळ
आशीनगर झोन : कामठी रोड, गुरुद्वाराच्या मागे
मंगळवारी झोन : गद्देघाट स्कूल, मंगळवारी छावणी

Web Title: Change the old currency district office