
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीतून आरोपीला अभय देणे मारेगावच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मारेगाव (जि. यवतमाळ) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १३ मार्च २०१७ रोजी मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील गिट्टीखदान परिसरात घडली होती. १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी झोपडीत एकटीच असल्याची संधी साधून शेषराव शिंदे याने अत्याचार केला होता. अत्याचारामुळे पीडितेला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. अत्याचार झाल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांसोबत पोलिस ठाणे गाठले. तेथे कार्यरत पोलिस निरीक्षक संजय शिरभाते व पोलिस उपनिरीक्षक अरुण राऊत यांनी पीडितेची फिर्याद न नोंदविता वडिलांना दहा हजार रुपये देऊन परत पाठवले व आरोपी शेषराव शिंदेला सोडून दिले.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणात आर्थिक देवाणघेवाणीतून आरोपीला अभय देणे मारेगावच्या तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. न्यायालयाच्या आदेशाने पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक संजय शिरभाते (वय ५०) व पोलिस उपनिरीक्षक अरुण राऊत (वय ४६) अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दखलपात्र गुन्हा नोंदविण्यास विलंब केला होता.
सविस्तर वाचा - काय सांगता! हे धरण 28 वर्षांत तब्बल 19 वेळा झाले ओव्हर फ्लो.. वाचा सविस्तर
या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यास विलंबाचे कारण अतिरिक्त सत्र न्यायाधीश केळापूर यांच्या आदेशाचे पत्र उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना प्राप्त झाले. आदेशाच्या तपासाअंती या प्रकरणी साक्षीदारांच्या साक्षीनुसार दोषी असल्याचे आढळून आल्याने अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा महाराष्ट्र पोलिस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यामुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संपादन - स्वाती हुद्दार