सरकारी कंपनीची मेट्रो स्टेशनवर चार्जिंग सुविधा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : सौरऊर्जा प्रकल्पातून 65 टक्के ऊर्जानिर्मितीचा निर्धार केलेल्या महामेट्रोने गुरुवारी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. महामेट्रोने केंद्र सरकारच्या ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड कंपनीशी करार करीत मेट्रो स्टेशनवर वाहन चार्जिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे ही कंपनी चार्जिंग स्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेसाठी महामेट्रोला भाडेही देणार आहे.

पर्यावरण संवर्धनाला महामेट्रोने नेहमीच प्राधान्य दिले. इलेक्‍ट्रिक वाहन चार्जिंगसाठी महामेट्रोने ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेड या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीसोबत गुरुवारी सामंजस्य करार केला. महामेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्‍यूरमेट विभाग) आनंद कुमार व ऊर्जा दक्षता सेवा लिमिटेडचे पूर्व महाराष्ट्र प्रादेशिक विभागप्रमुख किशोर चव्हाण यांनी सामंजस्य करारवर हस्ताक्षर केले. संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (प्रकल्प) महेश कुमार यावेळी उपस्थित होते.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी सातत्याने सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला. नागपूर मेट्रोचे चार स्टेशन तसेच मेट्रो भवनवर सौर पॅनल लावले आहे. महामेट्रो टप्प्याटप्प्याने सर्व स्टेशनवर सौरऊर्जेचे पॅनल बसविणार आहेत. पर्यावरणपूरक मेट्रोची संकल्पना राबवताना मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग पॉईंट स्थापन करण्यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय ई-मोबिलीटी कार्यक्रम तयार करण्यात आला. याअंतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्‍चर तयार करण्याचा मुख्य मानस आहे. आजच्या सामंजस्य करारमध्ये मेट्रोच्या मेट्रो स्टेशन येथे ऊर्जा दक्षता विभागातर्फे चार्जिंग उपकरण व विद्युत व्यवस्था बसविण्यात येईल. त्या मोबदल्यात महामेट्रोला जागेचे भाडे मिळेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charging facility at a government company's metro station