"चेस'ने होणार इंग्रजी भाषा समृद्ध

मंगेश गोमासे
शुक्रवार, 12 जुलै 2019

नागपूर : इंग्रजी विषय म्हटला की अनेकांची बोलती बंद होते. अनेकांना इंग्रजी कळत असली तरी, ती लिहिता आणि बोलता येणाऱ्यांचा टक्का तसा कमीच. त्यामुळे अगोदर मास्तरांचेच इंग्रजी पक्के करण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाद्वारे (आंग्लभाषा विभाग) "चेस' (कन्टिन्युअस हेल्प टू टीचर्स ऑफ इंग्लिश फॉर्म सेकंडरी ऍण्ड सिनिअर सेकंडरी स्कूल) या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येणार आहे. प्रकल्पानुसार ऑगस्ट महिन्यात शिक्षकांच्या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. यामुळे राज्यातील 22 लाख 53 हजार 806 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

बारावीच्या अभ्यासक्रमात यावर्षी इंग्रजी विषयाचा निकाल 86 टक्के लागला. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने निकाल पाच टक्‍क्‍यांनी पडला. यावर्षी बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला होता. यानुसार इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत आकलनक्षमतेवर आधारित प्रश्‍नांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे घोकंपट्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्‍न सोडविणे बरेच कठीण गेले. त्यामुळे बारावीचा निकाल पडला. विद्यार्थ्यांना या गोष्टी उमगण्याअगोदर त्या अभ्यासक्रमातील बारकावे शिक्षकांनाच येणे अपेक्षित आहे. त्यासाठी इंग्रजीच्या अध्यापन कौशल्याला स्वत: आत्मसात करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाद्वारे शिक्षकांना इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठीच "चेस' प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इंग्रजी शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण इंग्लिश टीचर फोरमच्या (ईटीएफ) माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 40 ते 50 शिक्षकांचा मिळून एक फोरम तयार करण्यात येईल. अशाप्रकारे संपूर्ण राज्यात 6 हजार 307 शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Chase" will enrich English language