महिलेशी चॅटिंग करणे भोवले

Chatting
Chatting

नागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पूनम चेंबर परिसरात रविवारी (ता. ११) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी बोनिसिंग भूपेंदरसिंग पुरी (वय २७ रा. आशीनगर) याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरुन तीन युवकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 

रमनदीपसिंग बाबा (वय २८, रा. गुरुनानक, सनी वाडे (रा. ऑटोमोटिव्ह चौक) आणि अविनाश अशी आरोपींची नावे आहेत. बोनिसिंग भूपेंदरसिंग पुरी (वय २७, रा. आशीनगर) आणि रमनदीपसिंग बाबा हे दोघेही एकाच जिममध्ये व्यायामाला जातात. दरम्यान, त्यांची मैत्री झाली. यादरम्यान रमनदीपसिंगने त्याचा भाऊ आणि त्याची बहीण यांच्याबद्दल माहिती दिली. दोघेही मुंबईला राहतात. यावरून बोनिसिंग याची रमनदीपसिंगच्या बहिणीशी फेसबुकवरून मैत्री झाली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी चॅटिंग करू लागले. यातूनच बोनिसिंग आणि त्याच्या बहिणीचे नागपूरला आल्यावर पूनम चेंबर येथे भेटण्याचे ठरले.

ठरल्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी बोनिसिंगला पूनम चेंबरजवळ भेटायला बोलावले. तो महिलेला भेटायला पोहोचला असता आरोपीही तेथे पोहोचले. त्यांनी बोनिसिंगला कारमध्ये डांबले व कोराडी येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी त्याला बेस बॉल स्टीक व दगडाने बेदम मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला. त्याला परत पूनम चेंबरजवळ आणून सोडले. मात्र, आरोपींपैकी दोघांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दोन दिवसांनी तो पोलिस ठाण्यात पोहोचला व तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com