स्वस्त धान्य दुकानदारांचे आमदारांच्या घरासमोर धरणे 

Cheap food shopkeepers agitation front of the MLAs house in akola
Cheap food shopkeepers agitation front of the MLAs house in akola

मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या : 

  • रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात यावे
  • शिधापत्रिका धारकांचे आधार लिंक करून डी वन रजिस्टर दुकानदारांना देण्यात यावे
  • शिधापत्रिका धारकांचे सत्यापर्ण शासनाने करून घ्यावे
  • सर्व शिधापत्रिका धारकांना दरमहा दोन लिटर रॉकेल देण्यात यावे
  • रास्तभाव दुकानदारांना 2 कोटी रुपये थकीत देयक द्यावे 
     

या मागण्यांसाठी आमदार हरीष मारोती आप्पा पिंपळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनावर दिलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचे सोबत चर्चा घडवून आणून आमच्या समस्या निकाली काढण्यात याव्या, असेही निवेदनात नमुद आहे. निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे मूर्तीजापुर तालुका अध्यक्ष कैलाश महाजन, गजानन बोरडे, दादाराव जामनीक, सलीमभाई, देवानंद वानखडे, भिमराव कोकणे, जगदीश मारोटकर, संतोष गायकवाड, अजय अग्रवाल, कैलास ढोके, अनिसभाई,संजय पखाले, सुमीत सोनोने, इलियासभाई, प्रदीप भालेराव, दिनेश निमोदीया, प्रविण खोत, चेतन राऊत, अजय भारती, निलेश अग्रवाल, संजय महाजण, प्रेमचंद नेभनाणी, विककी गवई व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते, हाँकर्स संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com