cheated by showing a job bait
cheated by showing a job bait

नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांचा गंडा

मंगरुळपीर (वाशीम) : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मंगरुळपीर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी श्‍यामराव पांडुरंग शेंदूरकर (रा.जुना आठवडी बाजार, मंगरुळपीर) यांनी तक्रार दिली की, जय विजयसिंग ठाकूर (रा. कानपूर उत्तर प्रदेश), सुनील चाफे (रा. शिवाजी चौक नाशिक) व एक महिला यांनी ता. 6 नोव्हेंबर 2018 ते ता. 20 डिसेंबर 2018 दरम्यान नातवास शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून बनावट ऑर्डर दिली. तसेच सदरील ऑर्डर बनावट नाही असे भासविले. तसेच रिक्रुटिंग ऑफिस नाशिक यांचा राजमुद्रा असलेला शिक्का वापरला. फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेऊन फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय आदिनाथ मोरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com