‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’च्या नावाखाली फसवणूक!

‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’च्या नावाखाली फसवणूक!

नागपूर - ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये मिळणार असल्याचे सांगून शाळा विद्यार्थिनींकडून अर्ज भरून घेत आहे. मात्र, अशा प्रकारची कुठली योजना केंद्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाची नसल्याने शाळांकडून  एक प्रकारे विद्यार्थिनींची फसवणूक होत आहे.  

२०१५-१६ मध्ये मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ही योजना करण्यात आली. प्रथम टप्प्यात देशातील १०० जिल्ह्यांत ही योजना सुरू केली. तर दुसऱ्या टप्प्यात योजनेची व्यापकता वाढवत ६१ जिल्ह्यांत सुरू केली. या योजनेची परिणामकारकता लक्षात घेत केंद्राने वर्ष २०१८-१९ पासून ही योजना संपूर्ण देशभरात लागू केली. यात मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे, शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, लिंग गुणोत्तर वाढविणे आदी उद्दिष्टे ठेवण्यात आली. 

यासाठी विविध पातळीवर प्रचार-प्रसिद्धी चर्चा सत्रांचे आयोजनही करण्यात येत आहे. परंतु, काही मध्यस्थ व काही संस्था या योजनेच्या नावाखाली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण  जनतेची लुबाडणूक करीत असल्याचे लक्षात येत आहे. त्यात अशा व्यक्ती व संस्था मुलींच्या नावे अर्ज भरून घेत त्यापोटी अर्जाची किंमत व नोंदणी फी वसुल करीत आहे. तसेच मुलींच्या नावे २ लाख रुपयापर्यंत लाभ मिळण्याचे आमिष देत आहे. अशा तक्रारी मौखीकरित्या जि.प.च्या महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. 

ही पूर्णत: प्रचार प्रसिद्धीची योजना असून, समाजात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची ही योजना आहे. यात कुठल्याही प्रकारचा रोख स्वरूपाचा लाभ देण्यात येत नाही. काही संस्था, व्यक्तींकडून सांगण्यात येणारी योजना फसवी आहे. अशा व्यक्ती संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
-भागवत तांबे,  महिला बालकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com