कारखान्यामुळे शेत, विहिरींमध्ये केमिकलयुक्त पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

अमरावती ः नांदगावपेठ एमआयडीसीमधील एका कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे या भागातील अनेक विहिरी तसेच शेतात केमिकलयुक्त पाण्याचा तवंग जमा झाला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून प्रशासनाकडून ंसंबंधित उद्योगावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये एसएमएस नामक कारखान्यातून दूषित पाणी बाहेर सोडले जात असून मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. परिसरातील शेतजमिनीवर सुद्धा याचा परिणाम होत आहे.

अमरावती ः नांदगावपेठ एमआयडीसीमधील एका कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे या भागातील अनेक विहिरी तसेच शेतात केमिकलयुक्त पाण्याचा तवंग जमा झाला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून प्रशासनाकडून ंसंबंधित उद्योगावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये एसएमएस नामक कारखान्यातून दूषित पाणी बाहेर सोडले जात असून मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. परिसरातील शेतजमिनीवर सुद्धा याचा परिणाम होत आहे. पिकांची नासाडी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार केल्या, त्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराला भेट देऊन प्रभावित शेतजमिनी, विहिरी तसेच संबंधित कारखान्याला भेटी देत दूषित पाण्याचे नमूने घेतले. सध्या या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत असून विहिरी व शेतांमध्ये हेच केमिकलयुक्त पाणी दिसून येत आहे. या संदर्भात मागील आठवड्यात मंत्रालयात बैठकसुद्धा बोलविण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिकांचा रोष असताना सुद्धा संबधित कारखान्याकडून दूषित पाण्याचा निचरा शेतामध्ये केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical water in fields, wells due to factories