"केम'च्या व्यवस्थापकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

अमरावती : समन्वयित कृषिविकास प्रकल्पांतर्गत (केम) 6 कोटी 12 लाख रुपयांच्या खरेदी अपहार प्रकरणात अमरावती येथील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक स्वप्नील पळसकर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी (ता. 13) रात्री अटक केली. आज, बुधवारी पळसकरला तपास अधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता. 16) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

केम प्रकल्प अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातसुद्धा राबविला होता. जिल्हानिहाय त्याचे कार्यालय होते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये जिल्हास्तरावरील अन्य अधिकाऱ्यांवरसुद्धा अटकेची कारवाई होऊ शकते. अमरावती येथील गणेश चौधरी गुरुवारी (ता. आठ) पहिल्यांदाच आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांपुढे चौकशीसाठी हजर झाला. त्याच्या अटकपूर्व अंतरीम जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. गुरुवार (ता. आठ) ते शनिवार (ता. 10) असे सतत तीन दिवस तपासयंत्रणेपुढे बयाण नोंदविण्यास तो उपस्थित झाला. त्याने या व्यवहारातील खरेदी फक्त दोन कोटी 9 लाख रुपयांची असल्याचे तपास अधिकाऱ्यांपुढे सांगितले होते. त्यामुळे या अपहारप्रकरणात चौकशी जसजशी पुढे जाईल तसतसे नवनवीन तथ्य पुढे येऊ शकतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Chem's manager arrested"