छत्रपतींचे किल्ले भाड्याने देणारे सरकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नागपूर ः आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिल्यास सत्ताधाऱ्यांना शिवशंभुप्रेमींच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले हेच सरकार आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नागपूरला आली आहे. या दरम्यान अमोल कोल्हे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत ते बोलत होते. किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असे सरकार तोंडी सांगत आहे. मात्र, लेखी आदेश दाखवत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील. यात्रेदरम्यान विदर्भात आतापर्यंत सात सभा झाल्या. जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लभत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि संविधान देशाला दिले. हे सरकार संविधानाचेच दहन करायला निघाले आहे. त्यामुळे तरुण, शेतकऱ्यांसह सर्वांमध्येच असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच परावर्तित होईल.

सरकारने दिले आश्‍वासनांचे गाजर
50 हजार रोजगार देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात 500 लोकांनाही रोजगार दिला नाही. पतंजलीला कोट्यवधीची जमीन दिली, त्यातूनही युवकांना रोजगार मिळाला नाही. वनरक्षक भरती आणि परिवहन विभागाच्या भरतीतही गैरप्रकार झाला. सरकार जे काही करत आहे, त्याचा हिशेब त्यांना महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला द्यावा लागणार आहे, असेही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati's fort leasing government