चिकनचे भाव गडगडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नागपूर ः विदर्भातील पोल्ट्री उद्योगाला भरारी आली असताना मागणीपेक्षा कोंबड्याचे उत्पादन 25 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. तसेच सात ते आठ महिन्यांपासून मक्‍यासह इतरही कोंबड्यांच्या खाद्याचे दर वाढलेले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कोंबड्यांची विक्री करावी लागत असल्याने विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांची आर्थिक अडचणीत सापडला आहे.

नागपूर ः विदर्भातील पोल्ट्री उद्योगाला भरारी आली असताना मागणीपेक्षा कोंबड्याचे उत्पादन 25 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. तसेच सात ते आठ महिन्यांपासून मक्‍यासह इतरही कोंबड्यांच्या खाद्याचे दर वाढलेले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कोंबड्यांची विक्री करावी लागत असल्याने विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांची आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्‍चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम तर पूर्व विदर्भात नागपूरसह वर्धा येथे हा उद्योग विस्तारलेला आहे. गणेशोत्सवामुळे खवय्यांची संख्या कमी झालेली असताना कोंबड्याच्या उत्पादनातही वाढ झालेली आहे. त्यातुलनेत मागणीत 25 टक्‍क्‍यांनी घटलेली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत निर्माण झाल्याने कोंबड्याचे भाव गडगडले आहेत.
उत्पादन शुल्क आणि बाजारातील दर यामध्येही प्रतिकिलो कोंबड्याचे दर 30 रुपयांनी कमी आहे. यामुळे कोंबड्याच्या पालन पोषणाचा खर्चही निघणे कठीण झालेले आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यात विदर्भातील कोंबड्यांना मागणी सुरू आहे. ही मागणी कमी झाल्यास कुक्‍कुटपालन करणारे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. या तीन राज्यांत होत असलेल्या मागणीमुळे विदर्भातील कोंबड्यांना बरे भाव मिळत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
व्यावसायिकांनी विदर्भात कोंबड्याच्या उत्पादनावर भर देण्यापेक्षा मार्केटिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे. सध्या कोंबड्याचा घाऊक बाजारात प्रतिकिलो दर 45 ते 48 रुपये आहे. तो उत्पादन खर्चापेक्षा 30 टक्के कमी आहे. बॉयलर अड्यांची मागणी कमी झाल्याने त्याचेही दर घटल्याने अंडी उत्पादकही आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
कोंबड्यांना लागणाऱ्या मक्‍याच्या खाद्याचे दर पूर्वी 22 रुपये किलो होते ते 34 किलोवर पोचले आहेत. खाद्याचे दर वाढले असल्याने केंद्र सरकारने मका आयात करावा आणि वाढत्या खाद्याच्या दरावर नियंत्रण आणावे. कुक्‍कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी.
- सुधीर दुद्दुलवार, संचालक, पोल्ट्री फार्म


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chicken prices fell