मुख्य वनसंरक्षकांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. त्यांच्याकडील डेबिट कार्डची माहिती घेऊन खात्यातून पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. त्यांच्याकडील डेबिट कार्डची माहिती घेऊन खात्यातून पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले.
मंगळवारी बाजार, स्टारकी टाउन रहिवासी डॉ. श्रवन श्रीवास्तव (59) हे कार्य आयोजन विभागाचे मुख्य वनसंरक्षकपदावर कार्यरत आहेत. 4 डिसेंबर रोजी रविनगरातील वनविभागाच्या कार्यालयातील आपल्या कक्षात हजर असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. वेगवेगळ्या तीनजणांनी फोन करून ते बॅंकेचे अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडे असलेल्या एसबीआयच्या डेबिट कार्डची मुदत संपत असून नवीन कार्ड तयार करून देणार असल्याची थाप मारून डेबिट कार्डची सविस्तर माहिती घेतली. आरोपींनी त्या आधारे यूपीआय पेऍपद्वारे त्यांच्या खात्यातून 1 लाख 75 हजार रुपये अन्य खात्यांत ऑनलाइन वळते केले. या प्रकरणी डॉ. श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
धनादेशाचा गैरवापर
मारुती शोरूमच्या कर्मचाऱ्याने सुरक्षा ठेव म्हणून प्राप्त धनादेशाचा गैरवापर करीत ग्राहकाच्या खात्यातील पावणेदोन लाख रुपये लंपास केले. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी विश्‍वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. धनगरपुरा, हिंगणा येथील रहिवासी विठ्ठल झगळे (45) यांना वाडीतील सेवा मारुती शोरूममधून मे 2017 मध्ये इको ही कार घेतली. त्यासाठी कोटक महिंद्रा बॅंकेच्या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. नियमानुसार, सुरक्षा म्हणून त्यांनी शोरूमचा कर्मचारी सौरभ आगे (28) याच्याकडे चार कोरे धनादेश सही करून दिले होते. मे 2017 ते 6 जून 2018 दरम्यान सौरभने हे धनादेश बॅंकेत जमा न करता स्वत:च्या नावाने विड्रॉल करून झगळे यांचा विश्‍वासघात केला. त्यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Chief Forest guard's Fraud