"त्या' पीएसआय पदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

अनिल कांबळे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पोलिस विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पोलिस कर्मचारी अजुनही पदाच्या प्रतीक्षेत आहेत. नागपुरातील 394 पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणावर लकवरच तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. 

नागपूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पोलिस विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले पोलिस कर्मचारी अजुनही पदाच्या प्रतीक्षेत आहेत. नागपुरातील 394 पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणावर लकवरच तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. 

लोकसेवा आयोगाने2013 ला घेतलेल्या परीक्षेत नागपूर शहर आणि परीक्षेत्रासह 2 हजार 222 पोलिस कर्मचारी उत्तीण झाले होते. पोलिस कर्मचारी ते थेट पोलिस अधिकारी होण्याचा संधी त्यांना मिळाली होती. यामध्ये शहर पोलिस दलातील 394 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, तेव्हापासून पोलिस कर्मचारी वर्दीवर "दोन स्टार' लागण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या प्रकरणी नुकताच आमदार परिणय फुकेंच्या माध्यमातून पात्र कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

प्रतीक्षेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना किमान अकरा महिन्यांचा पोलिस उपनिरीक्षक पदाचा ऑर्डर काढावा, अशी रास्त मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. नागपूर पोलिस दलात जवळपास 700 पेक्षा जास्त पोलिस उपनिरीक्षकांची गरज आहे. शहर पोलिस दलात 394 कर्मचारी पोलिस अधिकारी होण्याच्या पात्र आहेत. त्यामुळे जर "त्या' कर्मचाऱ्यांनी अधिकारी दर्जा मिळाल्यास नागपूर पोलिसांची क्षमता वाढेल. अधिकाऱ्यांचा अनुशेष भरून निघेल. पात्र असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे. 

जुनं ते सोनं 
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन युवा फौजदार पोलिस दलात दाखल होतात. मात्र, दोन ते तीन वर्षांच्या अनुभवानंतरही त्यांना साधा पंचनामा, सान्हा, अटक, जप्ती किंवा फिर्यादीची तक्रारही घेता येत नाही. शिपायांच्या अनुभवावर ही सर्व कामे केली जातात, हे वास्तव आहे. परंतु, पोलिस दलात पीएसआय पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 15 ते 20 वर्षाचा अनुभव असल्याने प्रशिक्षित अधिकारी मिळतील. 

न्यायालयात सदोष जेष्ठता यादी 
पोलिस महासंचालक कार्यालयातून 15 जून 2018 मध्ये सदोष सेवा जेष्ठता यादी न्यायालयात सादर करण्यात आली होती. यावर उपनिरीक्षक अर्हता परीक्षा उत्तीर्ण कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. यादीत दुरूस्ती करून यादी पुन्हा पाठवावी, अशी सूचना महासंचालकांनी घटकप्रमुखांना दिल्या होत्या. मात्र, अद्यापर्यंत जेष्ठता यादी पाठविण्यात आली नाही, हे विशेष. 

Web Title: Chief minister decides about that post of PSI