मुख्यमंत्री, गडकरींसाठी निकाल प्रतिष्ठेचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपूर महापालिकेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. नागपूर महापालिकेच्या निकालाची व्यवस्था पूर्ण झाली असून, नागपुरातील 12 ठिकाणी गुरुवारी (ता. 23) मतमोजणी सकाळी 10 पासून सुरू होणार आहे. महापालिकेचा पहिला निकाल एक तासात लागण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर महापालिकेचा निकाल फडणवीस व गडकरी त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. विद्यमान महापालिकेत भाजपला बहुमत नव्हते. भाजपचे 62 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना, मनसे, मुस्लिम लीगला सोबत भाजपने नागपूर विकास आघाडी स्थापन केली होती. सध्या महापालिकेला पूर्ण बहुमत न मिळाल्यास हा भाजपचा पराभव असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे भाजपची सारी यंत्रणा या निवडणुकीमागे लागली होती. या वेळी भाजप-सेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी न झाल्याने या चारही पक्षांना स्वबळ दिसून येईल. 

Web Title: Chief Minister,Gadkari the results for the prestigious