बुद्धिस्ट थिम पार्कला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

ड्रॅगन पॅलेस
ड्रॅगन पॅलेस

नागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेसमध्ये साकारण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट थिम पार्क या प्रकल्पाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या शिखर समितीने मान्यता दिली. 214 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निधीची व्यवस्था करण्यात येईल.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पाचे सादरीकरण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून एनएमआरडीएला नियुक्त करण्यात आले आहे. प्रन्यासने सादर केलेल्या 214 कोटींच्या अंदाजपत्रकास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. ड्रॅगन पॅलेसला "अ' वर्ग दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली होती. ड्रॅगन पॅलेस या स्थळाला देशी-विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. या स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली. बुद्धिस्ट थिम पार्कसोबत कन्व्हेन्शन सेंटरही येथे उभारण्यात येणार आहे.
या थिम पार्कअंतर्गत विपश्‍यना केंद्र, मेडिटेशन, सेंटरचे उद्‌घाटन यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले आहे. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जपान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड आदी देशांनी स्वीकारले आहे. या थिम पार्कमुळे बुद्धांचे तत्त्वज्ञान स्वीकारलेले देश आणि भारतीय संस्कृतीचे आदानप्रदान होईल. यामुळे देशाचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com