मुख्यमंत्र्यांच्या शहरातील संस्था गुजरातमध्ये पळवली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

नागपूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील महत्त्वाची राष्ट्रीय खाण आरोग्य स्वायत्त संस्था गुजरामध्ये पळविण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशभरातील खाण कामगारांच्या आरोग्य हितरक्षणासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेचे मुख्यालय नागपूरमध्ये होते. खाणींचे नूतनीकरण करताना त्यातील तीन टक्‍के कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. कामगारांचे आरोग्य आणि स्वच्छता ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे.

नागपूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील महत्त्वाची राष्ट्रीय खाण आरोग्य स्वायत्त संस्था गुजरामध्ये पळविण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेचे मुख्यालय अहमदाबादला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.देशभरातील खाण कामगारांच्या आरोग्य हितरक्षणासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेचे मुख्यालय नागपूरमध्ये होते. खाणींचे नूतनीकरण करताना त्यातील तीन टक्‍के कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे. कामगारांचे आरोग्य आणि स्वच्छता ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. विदर्भ आणि मध्यभारतामध्ये खाणींचे प्रमाण सर्वाधिक असतानाही केंद्रसरकारने नागपुरातील मुख्यालय पळविल्याने आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे.विशेष म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकाळात विदर्भातील संस्था आणि प्रकल्प पश्‍चिम महाराष्ट्रात पळवून नेल्या जात असल्याचा आरोप भाजपतर्फे सातत्याने केला जात होता. विदर्भावर सर्वच बाबतीत अन्याय केला जात असल्याची ओरड केली जात होती. आता केंद्रात आणि राज्यात भाजपची संस्था असताना थेट मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्या शहरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली राष्ट्रीय खाण आरोग्य संस्थाच पळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा विदर्भातून प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस याबाबत विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देतात हे बघावे लागणार आहे.राष्ट्रीय खाण आरोग्य संस्थेचे नॅशनल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आयसीएमआरमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्याचे मुख्यालय गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये सर्वाधिक खाणी विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, या राज्यांत आहेत. त्यामुळे श्रमिकांच्या हितरक्षणासाठी संस्थेचे कार्यालय नागपूर या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात अन्य राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये खाणींची संख्या कमी आहे. असे असतानाही योजना आयोगाने छोट्या संस्थांना मोठ्या संस्थांनांमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या संस्थेचा बळी गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's City Institute Fled to Gujarat