मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीचा कानोसा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

नागपूर - नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये येऊ घातली आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूकपूर्व वातावरणाचा कानोसा घेतल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषदेत भाजप-सेनेची सत्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप सदस्यांमध्ये मतभेदाचे वातावरण आहे. पक्षाचे सदस्य पदाधिकाऱ्यांवर अकार्यक्षम असल्याचे आरोप करीत आहेत. सत्तापक्षाच्या सदस्यांची कामे होत नसल्याची ओरड आहे. याच दरम्यान जिल्हा परिषदेत काही अनियमिततेची प्रकरणे पुढे आली. या सर्व गोष्टींचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय घडवून आणणे गरजेचे असल्याची बाब काही ज्येष्ठ सदस्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. 

निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे काही विद्यमान सदस्यांना त्यांचे मतदार क्षेत्र बदलावे लागू शकते. नागपूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा  झेंडा कायम ठेवण्यासाठी आत्तापासूनच रणनीती आखणे गरजेचे आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रामगिरी बंगल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षा, भाजपचे सभापती व सत्तापक्ष नेत्यांची बैठक घेतली. निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचा सूचना केल्या. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबद्दल सदस्यांच्या असलेल्या तक्रारींवर त्यांच्याशी चर्चा केली. 

आपसात समन्वय साधून कामे करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या. जिल्हा परिषदेतील काही प्रकरणावरून कानउघडणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Chief ministers elections sense