video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवित्र दीक्षाभूमीवर नतमस्तक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शाल, दीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार केला.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 20) अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अस्थिकलशाचे दर्शन घेतले. स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प वाहून वंदन केले. 

अधिक माहितीसाठी - ऐका हो ऐका... राज्याच्या 383 शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 

शुक्रवार हा हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. शनिवारी कामकाज आटोपण्यात येणार आहे. दिवसभराच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमीच्या स्तूपासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प वाहून वंदन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार विनायक राऊत, माजी खासदार प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Image may contain: 6 people, people standing and outdoor

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. आनंद फुलझेले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शाल, दीक्षाभूमीची प्रतिमा देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनी स्तूपातील बांधकाम करण्यात येत असलेल्या सभागृहाची पाहणी केली. नंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. 

Image may contain: 8 people, people standing

विद्यार्थ्यांची घेतली भेट

दीक्षाभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लहान मुलांची भेट घेतली. हे विद्यार्थी केवळ मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी आले होते. त्यांच्याशी भेट होईल व हस्तांदोलन होईल अशी कल्पनाही त्यांनी नव्हती. फक्त मुख्यमंत्र्यांना बघायला मिळाले तरीही ठीक असेच या मुलांच्या मनात होते. 

मुख्यमंत्र्यांचे हस्तांदोलन

स्तूपाच्या बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बाजूला जाऊन थांबलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलले आणि हस्तांदोलन केले. तसेच त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. एक ते दीड मिनिटांची त्यांची ही भेट होती. मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही यावेळी उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's udhav thakre visit to dikshabhumi