मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 4 ऑगस्टला गडचिरोलीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 4 ऑगस्टला गडचिरोलीत येणार असून येथे रात्री त्यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 4 ऑगस्टला गडचिरोलीत येणार असून येथे रात्री त्यांच्या विशाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर ही यात्रा वर्धा, नागपूर, गोंदिया आदी ठिकाणी जाऊन 4 ऑगस्ट रोजी गडचिरोलीत पोहोचणार आहे. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांची विशाल सभा होणार आहे. यावेळी राज्याचे वित्त व वनेमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके उपस्थित राहणार आहेत. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस हे राज्य सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे ठेवणार आहेत. सभेला जिल्ह्यातील सुमारे 25 हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी दिली. सभेनंतर दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's visit to Gadchiroli on August 4