अखेर प्रशासनाला आली जाग, चिखलदरा-परतवाडा रस्त्याच्या कामाला सुरुवात

chikhaldara paratwada road work starts in amravati
chikhaldara paratwada road work starts in amravati

चिखलदरा (जि. अमरावती) : अखेर विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला जाग आली असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून याठिकाणी शेकडोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी येत असतात. परंतु, सध्या याठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आठमुठ्या धोरणामुळे मेळघाटातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी भीषण स्थिती झाली आहे. चिखलदरा-परतवाडा मार्गाची अवस्थासुद्धा गेल्या दोन वर्षांपासून अतिशय वाईट झाली असतानाही त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याची गंभीर स्थिती होती. त्यामुळे 'सकाळ'ने हा मुद्दा लावून धरला. आमदार राजकुमार पटेल यांनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. 

प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असून हरी अमराईपासून परतवाडाकडे पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चिखलदरा, परतवाडा व चिखलदरा ते घटांग रस्त्यावर पॅचेस भरणे सुरू केले असून, पॅचेस झाल्याबरोबर 8 ते 15 दिवसांत डांबरीकरणाला सुरुवात करणार आहोत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरचे अभियंता चं. ऊ. मेहेत्रे यांनी दिली. 

आंदोलन स्थगित -
चिखलदरा-परतवाडा रस्त्याचे काम सुरू झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com