Childrens Drown : धरणावर पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

गावाशेजारी असलेल्या धरणावर पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
et Jadhav and Aditya Jadhav
et Jadhav and Aditya JadhavSakal
Summary

गावाशेजारी असलेल्या धरणावर पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

चिखली - गावाशेजारी असलेल्या धरणावर पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी घडली असून सायंकाळी उशिरा दोघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले. अनिकेत गजानन जाधव व आदित्य नारायण जाधव अशी मृत मुलांची नाव आहे.

अनिकेत चौथीत तर आदित्य पाचव्या वर्गात शिकत होता. दोघे मित्र काल दुपारी गावाशेजारी असलेल्या धरणात पोहायला गेले होते. अनिकेतला पोहायला येत होते मात्र आदित्यला पोहता येत नसल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा धरणात गाळात फसल्यामुळे बुडून दुर्दैवी अंत झाला. संध्याकाळी गावातील शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेला होते. त्यांना तलावाच्या काठावर मुलांचे चपला व कपडे आढळून आले.

त्यामुळे शेतकऱ्याने गावात जाऊन गावकऱ्यांना ही माहिती दिली. पाठोपाठ धरणावर गर्दी करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावातीलच शालीग्राम गवई यांनी पाण्यात उतरून शोध घेतला. त्यांच्या पायाला मुलांचे डोके लागले. त्यामुळे दोन्ही मुले गाळात फसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गावकऱ्यांच्या मदतीने अनिकेत आणि आदित्यचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दोघेही दुपारपासून पाण्यात बुडालेले असल्याने खेकडे आणि माशांनी मुलांना भक्ष बनवल्याचे दिसून आले. रात्री उशिरा अनिकेत वर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आदित्यचे वडील सुरतला कंपनीत कामाला असल्याने त्यांना यायला उशीर झाल्याने आदित्यचा अंत्यविधी आज सकाळी पार पडला. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com