सळाख घुसल्याने चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नागपूर - बोअरवेलमध्ये बंद पडलेली मशीन ट्रॅक्‍टरने बाहेर काढत असताना सळाख तुटून बाजूला खेळत असलेल्या चार वर्षीय मुलाच्या गळ्यात घुसली.

यात चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. ८) दुपारी अडीच वाजता नाईक रोड परिसरात घडली. जमावाने गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सैयद अरमान ऊर्फ अलफेस अली आबीद अली (वय चार वर्षे, रा. नाईकरोड, महाल) असे  मृताचे नाव आहे. 
नाईक रोडवरील बालाजी रेसिडेन्सी इमारतीचे काही महिन्यांपूर्वीच बांधकाम झाले. आठ  दिवसांपूर्वी इमारतीमधील बोरवेलची मशीन बिघडली. 

सोसायटीच्या सचिवांनी  दुरुस्तीसाठी कंपनीला बोलावले. आज दुपारी बोरवेल ट्रॅक्‍टरसह दोन मजूर आले. त्यांनी साखळदंडाने बोरवेलमधील मशीन बांधली. ती ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने बाहेर काढत असताना साखळीवरील ताण वाढल्याने ती तुटली आणि सळाख अरमानच्या गळ्यात घुसली. नागरिकांनी लगेच अरमानला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी ट्रॅक्‍टरचालक व मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.  मुलाचे वडील आबीद अली बजाज फायनान्स कंपनीत नोकरीला आहेत. 

ट्रॅक्‍टरची तोडफोड
चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नाईक रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी इमारतीच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. तसेच बोरवेल दुरुस्तीसाठी आलेल्या ट्रॅक्‍टरचीही तोडफोड केली. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोचल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

...तर टळली असती घटना
सकाळपासून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. मात्र, कुतूहलापोटी अरमान हे काम बाहेर उभा राहून बघत होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मजुरांनी अरमानला दोनवेळा घरी सोडून दिले होते. मात्र, तो पुन्हा आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. अरमानकडे कुणी लक्ष दिले असते तर घटना टळली असती.

कंत्राटदाराला अटक करा
कंत्राटदाराने कामात निष्काळजीपणा केल्याने अरमानचा नाहक बळी गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी त्याच्या अटकेची मागणी केली. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त राजकुमार यांनी संतप्त नागरिकांना आश्‍वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.

Web Title: child death in accident