मनोरुग्ण पित्याकडून चिमुकल्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुकुटबन/घोन्सा (जि. यवतमाळ) - एका निर्दयी पित्याने अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा कात्रीने भोसकून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी मुकुटबन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा (रुईकोट) येथे घडली.

याप्रकरणी त्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष धांडे (वय 30, भेंडाळा) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी अंश धांडे (वय सहा महिने) याच्या पोटात कात्री भोसकली. त्यात अंश जागीच ठार झाला. ही बाब कुटुंबीयांना व शेजाऱ्यांना माहीत होताच त्यांनी धाव घेतली. झरी जामणी ग्रामीण रुग्णालयात त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, संतोष मनोरुग्ण असल्याचे व त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: child murder by father