गारठा कायम राहणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

अमरावती - जम्मू-काश्‍मीरवर पश्‍चिमी चक्रवात आणि चक्राकार वारे सक्रिय झालेले आहेत. सोबतच 12 जानेवारीपासून दुसरा पश्‍चिमी चक्रवात हिमालयावर येण्याची शक्‍यता असल्याने सद्यःस्थितीत विदर्भातील गारठा आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. 

हिमालयात होत असलेली बर्फवृष्टी हा पश्‍चिमी चक्रवाताचा परिणाम आहे. सोबतच संपूर्ण उत्तर भारतासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भागात थंडीची लाट आहे. ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार आहे. मध्य भारतात येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमान 1 ते 3 अंश सेल्सिअसने कमी होईल. ही स्थिती बघता विदर्भात सध्या आहे तीच स्थिती कायम राहण्याची वा तापमान किंचित घसरण्याची शक्‍यता आहे, असा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी वर्तविला. 

Web Title: Chill will continue