चिमुर तालुक्यात विष प्रतिबंधक लस नसल्याचे उघड

चिमुर तालुक्यात विष प्रतिबंधक लस नसल्याचे उघड

चिमूर : पावसाळ्यात मोठया प्रमाणात साप, विंचू निघत असतात. तसेच मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सुद्धा वाढल्याने हे चावण्याची शक्यता असून यांच्या चावण्याने विष शरीरात जाऊन जीवितहानी होऊ नये याकरीता विष प्रतिबंधक लस दिल्या जातात. मात्र, चिमूर तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसच उपलब्ध नसल्याचे समोर आले.

ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पावसाळा लागल्यानंतर विषारी साप, विंचू आणि किड्यांचे बाहेर निघण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे घर, अंगण, पळस, शेती, नदी-नाले इथे कामानिमित्त गेलेल्या किंवा वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अथवा लहान मुलांना या विषारी जीवजंतूंचे चावण्याचे प्रमाण वाढते.

वेळेवर योग्य निदान आणि उपचार न झाल्यास जीव गेल्याचेही समोर आले आहे. तसेच मोकाट किंवा पाळीव कुत्रे चावल्यास विष अंगात संचार होऊन रेबिज होण्याचे प्रमाण वाढलेले आहे  या विषारी प्राण्यांच्या चावण्याने अंगात भिणलेल्या विषाकरीता शासनाकडून विष प्रतिबंध लस पुरवल्या जातात.

चिमूर तालुक्यात ग्रामीण जनतेच्या आरोग्य व उपचारासाठी भिसी, शंकरपूर, जांभूळघाट, नेरी, मासळ , खडसंगी असे सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. कोणत्याही प्रकारचे विषारी जीव-जंतू किंवा कुत्रा, साप चावल्यानंतर ग्रामीण उपचारांकरीता याच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरीता येतात. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार अशा रुग्णांकरीता आवश्यक असलेली विष प्रतिबंध लसच या तालुक्यातील आरोग्य केंद्रात  उपलब्ध नसल्याने अशा रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता निर्माण होण्याची भीती आहे.

तसेच खाजगी दवाखान्यात गेल्याने गरीब ग्रामीण शेतकरी शेतमजुरांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे  या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाने दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात विष प्रतिबंधक लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस गटनेते रोशन ढोक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com