चिंचोलीत भुताच्या अफवेने विद्यार्थ्यांनी सोडले वसतिगृह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

आम्हाला अत्यंत निकृष्ट दर्जाची सुविधा दिली जाते. सायंकाळी भुतांचा वावर असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आम्ही गावाकडे परत जात आहोत.
- सुनील लचय्या, विद्यार्थी

वसतिगहात भुताची अफवा विद्यार्थ्यांत पसरविली जात आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नाही. मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने पाण्याची समस्या होती. ती दूर करण्यात आली.
- ए. पी. पवार, अधीक्षक

सावित्रीबाई फुले वसतिगृहात सुविधांची वानवा
राजुरा (जि. चंद्रपूर) - भुताच्या अफवेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार चिंचोली येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडला. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले सामान घेत घराकडे पलायन केले. यामुळे संपूर्ण वसतिगृहच ओसाड झाले आहे.

तालुक्‍यातील चिंचोली येथे सावित्रीबाई फुले मुलामुलींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी जवळपास १५० ते १६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. येथील विद्यार्थी हे गडचिरोली जिल्ह्यातील लांबळपल्ली, पेंटीपाका, गुमलाकोंडा, राजनापल्ली, सोमनूर, मयगणपट्टा, गोरमपल्ली आदी गावांतील आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वसतिगृहात रात्रीच्या वेळी भुताची अफवा पसरली आहे. विद्यार्थ्यांनी थेट आपल्या पालकांना  संपर्क करून बोलावून घेतले. त्यांनी आम्हाला इथे राहायचे नसल्याचे सांगत घरी परतण्यासाठी आग्रह केला. लच्चया अजमेरा, सुरेश पोटाला, तिरुपती दुर्गम, श्रीनिवास गोगुला, सडवली आपुडारी, तुळशीराम दुर्गम, चंद्रया गोमाशी या पालकांनी वसतिगृह व्यवस्थापनावर संताप व्यक्‍त केला.

 

Web Title: Chincholi ghost rumor rajura students left the hostel

टॅग्स