माया गॅंगचा म्होरक्‍या चिंतलवारला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर : अजनीतील कुख्यात माया गॅंगचा म्होरक्‍या सुमित चिंतलवार याला दोन साथिदारांसह अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 9 बुलेट्‌स जप्त केल्या. उपराजधानीत पुन्हा या टोळीने थैमान घालू नये म्हणून मोक्‍का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी डिटेक्‍शन ब्रॅंचचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने आणि पोलिस निरीक्षक सत्यवान माने उपस्थित होते. गेल्या 12 वर्षांपासून गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या सुमित रमेश चिंतलवार (वय 31, रा. विश्‍वकर्मानगर) याच्यावर गंभीर स्वरूपाचे डझनापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

नागपूर : अजनीतील कुख्यात माया गॅंगचा म्होरक्‍या सुमित चिंतलवार याला दोन साथिदारांसह अटक केली. त्याच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे दोन पिस्तूल आणि 9 बुलेट्‌स जप्त केल्या. उपराजधानीत पुन्हा या टोळीने थैमान घालू नये म्हणून मोक्‍का कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी डिटेक्‍शन ब्रॅंचचे पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने आणि पोलिस निरीक्षक सत्यवान माने उपस्थित होते. गेल्या 12 वर्षांपासून गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या सुमित रमेश चिंतलवार (वय 31, रा. विश्‍वकर्मानगर) याच्यावर गंभीर स्वरूपाचे डझनापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. दारूबंदी जिल्ह्यात दारू तस्करी करण्याचा मुख्य व्यवसाय सुमित चिंतलवार आणि त्याचे साथिदार आकाश किशन चव्हाण (वय 26, सावित्रीबाई फुलेनगर) आणि स्वप्नील बाबूराव भोयर (वय 27, सावित्रीबाई फुलेनगर) यांनी सुरू केला होता. तसेच ग्रामीण भागात जुगार अड्‌डासुद्धा सुरू केला होता. सध्या नागपूर जिल्हा आणि शहरातून तडीपार असलेला सुमित चिंतलवार हा हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुमगाव येथील इम्पेरिअर सिटीमध्ये येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे एपीआय किरण चौगुले आणि दिलीप चंदन यांना मिळाली. त्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच सापळा रचला. रात्री दीड वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा घालून सुमितसह आकाश आणि स्वप्नीललाही अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल, 9 बुलेट्‌स, दोन कार, तलवार असा एकूण 19 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी हिंगणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सुमित चिंतलवारच्या टोळीवर नागपूरसह गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतही गुन्हे दाखल आहेत. नागपुरातील अजनी, प्रतापनगर, सोनेगाव, नंदनवन, सीताबर्डी, गणेशपेठ या पोलिस ठाण्यांसह चंद्रपुरातील पडोली आणि चंद्रपूर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जुगार, लूटमार, गॅंगवॉर असे अनेक गंभीर स्वरूपांचे गुन्हे माया गॅंगवर आहेत.सुमित चिंतलवारने ताराचंद खिल्लारेचा भाचा चिंटू घोंगडेचा खून केला होता. नंदनवनमध्ये 16 डिसेंबर 2018 मध्ये अर्जुन चेट्‌टीयार याचे अपहरण केले होते. भाजपचा नेता हेमंत दियेवार याचा शंकरनगर चौकात भरदुपारी गोळ्या झाडून खून केला होता. या हत्याकांडाचा सुमित मास्टरमाइंड होता. सुमितचे मिरी मिश्रा, सौरव ढगे आणि आशू अवस्थी यांच्याशी वैर होते. तो या तिघांचा "गेम' करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chintalwar Arrested