पैनगंगा अभयारण्यात चितळाची शिकार

मराठवाड्यातील तिघांना अटक; वनविभागाच्या पथकाची धडक कारवाई
Chital hunting in Panganga Sanctuary
Chital hunting in Panganga SanctuarySakal

उमरखेड (जि. यवतमाळ) - पैनगंगा अभयारण्यातील खरबी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वडगाव नियत क्षेत्रात चितळाची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चितळाच्या अवयवासह ताब्यात घेतले. तीनही आरोपी किनवट (जि. नांदेड) तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी आहेत.

पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या खरबी वनपरिक्षेत्राच्या पथकाला पैनगंगा अभयारण्याच्या वडगाव नियत क्षेत्राच्या सेंट मेरी स्कूलच्या मागे चिथळाची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे कोठारी येथील बाबू हनुमानदास याच्या फार्महाउसवर विभागीय वनअधिकारी किरण जगताप, सहायक वनसंरक्षक भारत खेलबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरबीचे वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर, वनपाल बी. व्ही. इंगळे, वनरक्षक एस. एल. कानडे, ए. आर. मुजमुळे, बी. आर. काशिंदे, जे. व्ही. शेबांळे, जी. एस. मुंडे, पी. आर. तांबे आदींनी ट्रॅप लावला.

सकाळी साडेसातला बाबू हनुमानदास या मुख्य आरोपीला चिथळाच्या अवयवासह रंगेहात पकडण्यात आले. दुसरा आरोपी मारोती आरमाळकर याच्याजवळून शिकारीसाठी वापरण्यात आलेले जाळे (वाघूर) जप्त करण्यात आले. हे जाळे (वाघूर) मारोती मेंडके याचे आहे. त्यालाही अटक करण्यात आली. तीनही आरोपींविरुद्ध वन गुन्हे नोंदविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com