कुत्र्याच्या हल्ल्यात चितळ ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) ः विहीरगाव शेतशिवारात चितळांच्या कळपावर कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात एक चितळ ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 8) सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान, जखमी चितळाला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्यात आले.

धाबा वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जंगलालगत विहीरगाव शेतशिवार आहे. त्यामुळे रानटी जनावरे या परिसरात नेहमीच भ्रमंती करीत असतात. अशातच सोमवारला सकाळी सात वाजतादरम्यान विहीरगाव शेतशिवारात चितळांचा कळप आला. यावेळी चार ते पाच कुत्र्यांनी चितळांच्या कळपावर हल्ला चढविला. या हल्ल्यात काही चितळ पळून जाण्यास यशस्वी ठरले. मात्र, एक चितळ जागीच ठार झाले; तर एक चितळ गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनरक्षक वेलमे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती जाणून घेत जखमी चितळाला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chital killed in a dog attack