गोसेच्या बॅक वाटरमुळे कोलारी जलमय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

भिवापूर (जि.नागपूर) : गावाला लागून असलेल्या दोन नाल्यांना गोसे धरणाच्या बॅकवाटरमुळे पुर येतो. पुराचे पाणी गावक-यांच्या घरात शिरून प्रचंड नुकसान होते. पावसाळ्यात हे नित्याचे झाले असून त्यातून मुक्ती देण्याकरिता संपूर्ण कोलारी गावाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी गावक-यांनी तहसिलदारांकडे निवेदनाद्वारे केली. शनिवारी (ता.7) कोलारीवासींनी तहसिल कार्यालयावर धडक देत तहसिलदार साहेबराव जाधव यांच्यापुढे व्यथा मांडल्या.

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने गावाला लागून असलेल्या दोन्ही नाल्यांना मोठा पूर येवुन पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला होता. त्यामुळे गावचा संपर्क तुटून गावक-यांना गावाबाहेर पडता येत नव्हते.150 घरे असलेल्या गावातील 50 च्यावर घरांत पुराचे पाणी शिरून घरातील धान्य, कपडे, भांडी यांचे मोठे नुकसान झाले. गोसे धरणातील पाण्याची थोप नाल्यांना येत असल्याने नाल्यांना आलेला पूर ओसरायला बराच वेळ लागतो. शुक्रवारी आलेला पूर संपूर्ण दिवस व रात्रभर कायम होता. या काळात कोलारीतील अनेक घरे पाण्यात बुडून होती. गावक-यांना जागून रात्र काढावी लागली. आज पूर ओसरल्यानंतर गावक-यांनी तहसिल कार्यालय गाठून पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी तात्काळ मदत पुरविण्याची मागणी केली. तहसिलदार साहेबराव राठोड यांनी पूरपिडितांना तातडीने अन्नधान्य पुरवून गावातील समाजभवनात त्यांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय करण्याचे कर्मचा-यांना आदेश दिलेत.
याप्रसंगी कोलारीचे सरपंच अरुण चवरे, रिपाईचे गुलाब जनबंधू, सेनेचे तालुकाप्रमुख संदिप निंबार्ते, दिलीप श्रीरामे, अविनाश मडावी, नंदा वैरागडे, प्रकाश माळवे, मनोहर मेंढे, सुखदेव भोयर, धनराज चहांदे, शालू चहांदे, भिमराव धनविजे, जयवंत ढोके, वर्षा माटे, निर्मला मेश्राम, छाया चहांदे, संगिता मेंढे, सुलोचना शेंडे, सखाराम धनविजे, कैलाश वैरागडे, माधव सोनवाने, नरेंद्र ढोके, केवळराम मडावी यांसह गावकरी महिला पुरुष मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Choleri burns because of Goose's back water