म्हैस चोरांना नागरिकांनी पकडले ; उस्मानगर ठाण्यात तिघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नांदेड : शेताच्या आखाड्यावरून किंमती पाळीव जनावरे पळविणारी टोळी सक्रीय झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. पोलिसही या चोरट्यांना पकडण्यासाठी हतबल झाले होते. यातच एका टेम्पोमधून म्हैस चोरून नेताना गावकऱ्यानी तिन चोरट्यांना पकडले. चोरांना उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन केले. 

उस्माननगर, कुंटूर व नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत शेतातील आखाड्यावरून किंवा गावातील गोठ्यातून पाळीव जनावरे पळविणारी टोळी सक्रिय झाली होती. बैल, गायी, म्हैस आदी पाळीव जनावरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यासंह पोलिसही हतबल झाले होते. अखेर ही टोळी नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. 

शुक्रवारी (ता. १०)  रात्री हिंदोळा ता. लोहा येथील आनंदा नारायण जाधव यांच्या शेतातील आखाड्यावरून 50 हजारांची म्हैस चोरून नेताना चोरट्यांना पकडले. चोरटे गणेश शामगीर गीरी, शामगिर गीरी महाराज रा. डोलारा आणि मारोती मोगलाजी रा. धनेगाव या तिघांनी (एमएच२६-एच-३४२२) या वाहनात म्हैस घालून काळ्या बाजारात किंवा कत्तलखान्यात विकण्यासाठी जात असल्याची माहिती गावकऱ्यांना समजताच शेताहून काही अंतरावर जाताच या तिन्ही चोरट्यांना पकडले.

उस्माननगर ठाण्यात या तिघांवर आनंदा जाधव यांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बेग हे करीत आहेत.

Web Title: Citizens caught buffalo thieves